Saturday, October 13, 2018

Time please:गण्यानं पार्टीच रद्द केली राव!


पूर्वी चार ढग एकत्र आले की मुसळधार पाऊस पडायचा. आता आभाळ ढगांनी अंधारले तरी थेंब निथळत नाही. पूर्वी विहिरीत नुसता हात टाकला की हाताला पाणी लागायचं. आता बुडाशी जाऊन बसलं तरी ओंजळ भरत नाही. पूर्वी माणसाच्या खांद्यावर हात ठेवला की आपुलकीचा झरा वाहायचा आता ह्रदयात हात घातला तरी ओल लागत नाही. थोडक्यात हे ढग काय, ही विहीर काय, हा माणूस काय चराचरातून ओलावा आटत चाललंय हेच खरं !
 *****
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत. ह्रदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यांसमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे !
 *****
गण्यानी आज कॉलेजच्या ग्रुपवर पोस्ट केलं की आज संध्याकाळी मी वैशालीत पार्टी देतोय कोण कोण येणार आहे?
 राजू : मी येणार.
सचिन : ख रा.
निलेश : मी पण.
सीमा : मी पण.
रेखा : me too
गण्यानं पार्टीच रद्द केली राव!
*****
लाईफ लई बोरिंग झाली आहे रे देवा... ऊचल एकदाचं ... ऊचल ... आणि नेऊन टाक गोव्याला.

No comments:

Post a Comment