Monday, October 15, 2018

Time please: वेळेची व्याख्या


वेळेची व्याख्या
वेळफार हळू येते जेव्हा आपण तिची उत्कंठेने वाट पहात असतो.
* ‘वेळखूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.
* ‘वेळअगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो.
* ‘वेळजाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात. प्रत्येक वेळीवेळआपल्या सोई प्रमाणे येत नाही, म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.
 ***
परिपक्वता म्हणजे काय ?
* जेव्हा तुम्ही घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर देता.
* जेव्हा तुम्ही नात्यामधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.
* जेव्हा तुम्ही दुसर्याकडून स्तुती अथवा शाबासकी मिळण्याची अपेक्षा न ठेवता काम करता.
* जेव्हा तुम्ही जगाला बदलवण्याचा नाद सोडून देता आणि स्वतः च्या सर्वांगीण विकासावर भर देता.
* जेव्हा तुम्ही लोकांना ते जसे आहेत तसेच स्वीकारता.
 * जेव्हा तुमचे आत्मिक सुख नेमके कशात आहे ते तुम्हाला समजते.
*जेव्हा तुम्ही स्वतः किती हुशार आहात हे जगाला पटवून द्यायच्या भानगडीत पडत नाही.
* जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना दुसर्याशी करणे सोडून देता.
* जेव्हा तुम्ही स्वतः मध्ये रममाण होता.
* जेव्हा तुम्हाला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्टपणे जाणवतो.
* जेव्हा तुम्ही आत्मिक सुखाचा सबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.  तुटलेली फुलेसुगंधदेऊन जातात... गेलेले क्षण, ‘आठवणदेऊन जातात... प्रत्येकांचेअंदाजवेगवेगळे असतात... म्हणून काही माणसंक्षणभर‘, तर काहीआयुष्यभरलक्षात राहतात...!!
 * जिव्हाळा हा घरचा कळस आहे. माणुसकी ही घरातील तिजोरी आहे. गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे. शांतता ही घरातील लक्ष्मी आहे. पैसा हा घरचा पाहुणा आहे. व्यवस्था ही घराची शोभा आहे. समाधान हेच घराचे सुख आहे.
***
गणू गरबा बघण्यासाठी गेला. तिथे त्याच्याकडे एक मुलगी सारखी टक लावून बघत होती. गणूची मान ताठ झाली. ती मुलगी गणूकडे येत होती तसा गणू एकदम खुप खुश झाला. मग तिने गणूला विचारले, ‘दादा, तुम्ही गरबा खेळत नाही तर प्लीज आमच्या चपलांवर नजर ठेवा ना...’
***
पोलीस : चौकातला सिग्नल तोडून पुढे का गेलास?
मोटारवाला : साहेब साईडला होर्डिंग होते.
पोलीस : जा बाबा जा...No comments:

Post a Comment