Saturday, October 6, 2018

Time please:जगण्याविषयी कुणाला ......


दोन शब्द 
जगण्याविषयी कुणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले वागू नये कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये नशिबाने जुळलेली नाती जपावी; पण स्वतःहून तोडू नये गोड बोलणे गोड वागणे कुणास अवघड वाटू नये जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊच नये सहजच विसरून जावे सारे सल मनात जपू नये नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे आपले नाव दुसर्याच्या ओठी राहील इतकेच करून जावे. कारण जीवनाच्या वाटेवर साथ देतात, मात करतात, हात देतात, घात करतात, तीही असतात... माणसं! संधी देतात, संधी साधतात, आदर करतात, भाव खातात तीही असतात..... माणसं! वेड लावतात, वेडंही करतात, घास भरवतात, घास हिरावतात तीही असतात..... माणसं! पाठीशी असतात, पाठ फिरवतात, वाट दाखवतात, वाट लावतात तीही असतात... माणसं! शब्द पाळतात, शब्द फिरवतात, गळ्यात पडतात, गळा कापतात तीही असतात... माणसं! दूर राहतात, तरी जवळचीच वाटतात, जवळ राहून देखील, परक्यासारखी वागतात तीही असतात... माणसं! नाना प्रकारची अशी नाना माणसं, ओळखायची कशी सारी असतात आपलीच माणसं!
 *****
किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा? याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजांनी दिले आहे. नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई- वडिलांची काळजी घेता यावी. अब्रूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. ‘ग्रंथसमजल्याशिवायसंतसमजणार नाही आणिसंतसमजल्याशिवायभगवंतसमजणार नाही.
 *****
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरु नका.
 *****
स्मशानभूमीच्या रस्त्याने रात्री एकटाच चाललो होतो तेव्हा दोन जण अचानक आडवे आले (बहुतेक लुटण्यासाठी), टिंगलीच्या स्वरात म्हणाले, ‘एवढ्या रात्री तेही एकटाच? भीती नाही वाटत? लई डेअरिंगबाज दिसतोय राव तूमी फक्त एवढंच म्हणालो, ‘भाऊ जिवंत होतो ना तेव्हा लई भ्यायचो.‘ ते दोघे दिसलेच नाही परत.


No comments:

Post a Comment