Friday, October 19, 2018

Time please:जीएसटी


1000 च्या खरेदीवर आपण किती कर भरतो? समजा तुम्हाला 1000 रुपयाची वस्तू खरेदी करायची आहे. त्यावर जीएसटी = 18 टक्के म्हणजे त्यासाठी तुम्हाला 1000 + 180 = 1180 रुपये भरावे लागतील. त्यासाठी तुमच्याजवळ 1180 रुपये असणे आवश्यक आहे. समजा मी 20 टक्के करदात्यांच्या गटात आहे. ज्यांची कमाई वार्षिक 5 ते 10 लाख आहे. जर मी 1486.15 रुपये कमवत असेल तर मी (20 टक्के) प्राप्तीकर भरत असतो. आणि इतर कर 8.92 रुपये (3 टक्के) इतका भरत आहे. हे सर्व सोडून माझी कमाई (प्राप्तीकर वगळून) 1180 असणार आहे. म्हणून मी जर 1000 च्या खरेदी करण्यासाठी मला 1486.15 रुपये कमवणे अपेक्षित आहे. याचा अर्थ असा की 1000 च्या खरेदीवर मी 486.15 रुपये इतका कर भरत आहे. म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर धरून मला 48.6 टक्के कर भरावा लागतो. जर मी सर्वात उच्च उत्पन्न गटातील करदात्यात असेल तर मला 1000 च्या खरेदीसाठी 1761 रुपये कमवावे लागणार आहेत (संपूर्ण टॅक्स 76.1 टक्के आहे.) आणि ज्या वस्तूवर 28 टक्के जीएसटी आहे. अशी वस्तू मी खरेदी केल्यास 1000 च्या खरेदीवर एकूण करासह मला 1910.45 कर भरावा लागेल. हे खूप साधे आणि वास्तवदर्शनी प्रदर्शन नुकत्याच आकारण्यात येणार्या करासंबंधीचे विवेचन आहे.
*****
आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भिती नसते, मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परिक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात, या परिक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतोच.
 *****
चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जेवाट’’ बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जेप्रयत्न’’ करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्याप्रयत्नांवर’’ अतूट विश्वास ठेवतातआयुष्य’’ अवघड आहे पण, अशक्य नाही.
 *****
लग्न म्हणजे, ’अहो, ऐकले का?’ यापासून तेबहिरे झालात का? पर्यंतचा प्रवासNo comments:

Post a Comment