Wednesday, October 3, 2018

Time please:डोक्यामध्ये दगड घालून...खून त्याचा केला...
 मरणारा तर मेला ...
 नंतर मारणाराही मेला...
 पण तो दगड तिथेच पडलाय, सांगतोय जगाला...
 मी किती पराक्रम केला...
दोघांचाही जीव घेतला...
’’ मित्रांनो, सावधान...!
 समाजात असे काही दगड आहेत...
 जे आपल्याला भांडायला लावतात.
आपण एकमेकांची डोकी फोडतो...
नुकसान आपले होते...
 बरबाद आपण होतो...
 आणि...
दगड मात्र बाजूला होतात...
 म्हणून शिवतंत्र सांगते :
 वध होण्याआधी सावध व्हा...
बरबाद होण्याआधी आबाद व्हा...
’’ मित्रांनो, शिवरायांचे शिवतंत्र समजून घ्या.
 जे लोक स्वत:च्या स्वार्थासाठी...,
 किंवा मोठेपणासाठी...
 जवळची माणसे तोडतात...
 असे लोक छोट्या छोट्या...
 लुटूपुटूच्या लढाया जिंकतील...
 पण अंतिम युद्ध कधीच...
 जिंकू शकत नाहीत...
कारण...
घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे...
 बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो...
 म्हणून शिवतंत्र सांगते...
 जोडता नाही आले तर...
 जोडू नका...
 पण लोकांना तोडू नका.’’
 *****
माणसाच्या परिचयाची सुरूवात जरी चेहर्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मांनीच होते. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण, या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील.
 *****
स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)
 पेशंट : डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर : लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून) : आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?No comments:

Post a Comment