Tuesday, October 16, 2018

Time please: तीन गोष्टी


तीन गोष्टी कधीच विसरू नये कर्तव्य, कर्ज, उपकार
तीन गोष्टींपासून नेहमी दूर रहावे व्यसन, जुगार, चोरी
तीन गोष्टींचा नेहमी आदर करावा आई, वडील, गुरू
तीन गोष्टी इतरांना देत चला दान, ज्ञान, मान
तीन गोष्टींची कधीही चोरी होत नाहीत ज्ञान, चारित्र्य, जिद्द
तीन गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात आई, वडील, तारुण्य
तीन गोष्टी अंगी असू द्याव्यात नम्रता, सौजन्य, सुस्वभाव
तीन गोष्टी सांगून येत नाहीत मूत्यू, आजार, वेळ
 *****
बँकेमधून फोन आला. एक मुलगी गोड आवाजात म्हणाली, तुम्ही 6000 रुपये दर महिना भरत रहा. आणि निवृत्त व्हाल त्यावेळी तुम्हाला 1 करोड़ मिळतील. मी म्हणालो, आपण उलट करू. तुम्ही मला आत्ता 1 करोड़ रुपये द्या. दर महिन्याला माझ्याकडून 6000 रुपये घेत रहा, तेही मी मरेपर्यंत. त्या मुलीने फोनच बंद केला. मी काही चुकीचे बोललो होतो का ?
*****
वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. घेऊन, तीच दहशत आणि तोच दरारा!
 *****
खूप खूप ताकद लागते आलेले अपयश पचवायला, डोळ्यात आलेले पाणी पुसून ओठांवर हसू खेळवायला काहीतरी ध्येय लागतं आपल्याला आयुष्यात जगायला, शेवटी अपयशाचीच गरज असते आयुष्यात खंबीर बनायला.
*****
मुलगा : आई मी मित्राकडे खेळायला जाऊ?
 आई : बाबांना विचार
मुलगा : बाबा मी मित्राकडे खेळायला जाऊ?
 बाबा : आईला विचार
मुलगा : अरे, हे घर आहे की तलाठ्याचं ऑफिस !

No comments:

Post a Comment