Saturday, October 6, 2018

Time please:घरात एक चालती बोलती

घरात एक चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते आहे सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेत आहे दुर्गा होऊन संकटांशी सामना करते आहे कालिका, चंडिका होऊन घराचे रक्षण करते आहे गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे तिची पूजा नको...पण... स्त्री म्हणून सन्मान व्हावा.

*****
ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी, फक्त स्वत:ला सिद्ध करण्याची जिद्द असावी...!!

*****
प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही किंवा असेही नाही की तो कमजोर आहे. फरक इतकाच असतो की, त्याला स्वत:च्या ‘इगो’ पेक्षा नाती जपत असताना एक पाऊल मागे का होईना येण्यात कमीपणा अथवा कोणत्याही स्वरूपाचा संकोच वाटत नाही. माणसे कमविण्यात जो आनंद आहे, तो पैसा कमविण्यात नाही...

*****
 वाळूमध्ये पडलेली साखर मुंगी खाऊ शकते परंतु हत्ती नाही. म्हणून छोट्या माणसांना कधी छोटे समजू नका. कधी कधी छोटी माणसे सुद्धा मोठी मोठी काम करून जातात.

*****
 आजोबा : बंड्या, लवकर लपून बस 8 दिवस शाळेत गेला नाहीस म्हणून तुझे सर आले आहेत तुला शोधायला. बंड्या : आजोबा, तुम्हीच लपून बसा. मी शाळेत सांगितलंय आजोबा वारले म्हणून

No comments:

Post a Comment