Tuesday, October 9, 2018

Time please:माझं कसे होईल ?


माझं कसे होईल ? हा प्रश्न मला कधी पडत नाही कारण सूर्य हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही. त्याप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे, तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणूस भीत नाही, आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.
 *****
प्रेमाच्या पाझराची वाहती एक सरिता, नात्यांच्या अतूट शब्दांनी गुंफलेली कविता, जाणिवेच्या पलीकडचे जगावेगळे गाव, यालाच तर आहेआयुष्यहे नाव
. *****
कोण म्हणे देव घरी येत नाहीत; शबरीसारखी वाट बघून तर पहा. कोण म्हणे देव काही देत नाहीत; ध्रुव,भगीरथासारखे मागून तर पहा. कोण म्हणे देव रक्षा करीत नाही; प्रल्हाद, द्रौपदीसारखी आळवणी करून तर पहा. कोण म्हणे देव ऐकत नाही; नरसी, तुकारामांसारखे बोलून तर पहा. कोण म्हणे देव नैवेद्य ग्रहण करत नाही; नामदेवांसारखे भरवून तर पहा. डोळे उघडूनी नीट पहा देव आपल्या सोबतच आहे!
 *****
पिकलेले फळ हे तीन गुणावरून ओळखले जाते. एक तर ते नरम होते. दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा तीन गोष्टी वरून करावी. प्रथम त्यात नम्रता असते. दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो. तिसरे म्हणजे त्याच्या चेहर्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. *****
तहान लागलेली असताना कोरड्या ओठांतून गोडच शब्द बाहेर पडतात. मात्र, एकदा का तहान भागली, की मगपाण्याची चवआणिमाणसाचे नशीबदोन्ही बदलतात. जोपर्यंत ठीक आहे, तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडतात थोडेसे काही कमी पडायला लागले, की लगेच देवळात जाऊन नारळ फोडतात.
 *****
विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण कारल कडू. ऊस गोड तर. चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे. दोष कर्माचा असतो.

No comments:

Post a Comment