Friday, November 9, 2018

लाचलुचपतकडून सांगली जिल्ह्यात 18 सापळे

जत,(प्रतिनिधी)-
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली जिल्हा शाखेकडून गेल्या अकरा महिन्यात 18 ठिकाणी सापळे रचण्यात आले. पुणे परिक्षेत्रातल्या सातारा, पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मिळून आतापर्यंत 165 ठिकाणी सापळे रचण्यात आले. गेल्या दोन वर्षातील सांगली जिल्ह्यातील सापळा रचण्याच्या आकडेवारीत घसरण दिसून येत आहे.याचा अर्थ जिल्ह्यात तक्रारीचा पाढा कमी असल्याचे दिसते.
गेल्या वर्षी (2017) पुणे परिक्षेत्रात 159 ठिकाणी सापळे रचण्यात आले. यात सर्वाधिक 61 सापळे पुणे जिल्ह्यात लावण्यात आले. त्याखालोखाल सोलापूर 33,कोल्हापूर 30 आणि सातारा 23 असे सापळे लावण्यात आले होते. सांगली जिल्ह्यात 17 ठिकाणी सापळे लावण्यात आले. यावर्षी अकरा महिन्यात हाच आकडा 165 वर पोहचला आहे. पुण्यात 65, सातार्‍यात 23, सांगलीत 18, सोलापुरात 33 आणि कोल्हापुरात 30 ठिकाणी सापळा रचून कारवाई करण्यात आली. पुणे परिक्षेत्रात यावर्षीची सापळा रचन्याची आकडेवारी किंचित वाढली असली तरी सांगली जिल्ह्यात मात्र फारशी वाढली नसल्याचे दिसते. गेल्यावर्षी 17 ठिकाणी तर यावर्षी 18 ठिकाणी सापळा रचन्यात आला.
या लाचखोरीत पोलिस खात्यासह महसूल विभाग आघाडीवर असल्याचे दिसते. पोलिस उपनिरीक्षकासह तीन कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली. औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तावरदेखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याशिवाय इस्लामपूरमधील मंडलाधिकारी, कुपवाडमधील तलाठी, आटपाडीत पोलिस, मंडलाधिकारी, सांगलीत पोलिस, कडेगाव तालुक्यात रामापूर येथे तलाठी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथील ग्रामसेवक, मिरजेतील वाहतूक पोलिस, महावितरण सहाय्यक अभियंता आणि कर्मचारी, तासगावात पोलिस, इस्लामपुरात स्टँप व्हेंडरवर तर आटपाडीत तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment