Thursday, November 15, 2018

18 पासून संत शिवलिंगव्वा पुण्यतिथी सोहळा


जत,(प्रतिनिधी)-
जत येथील बसवेश्वर मंदिरानजीक असलेल्या मठात संत शिवलिंगव्वा यांच्या 88 व्या पुण्यतिथीनिमित्त रविवार ता. 18 ते शनिवार ता. 24 अखेर पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संत शिवलिंगव्वा यांचे जत नगरीत वास्तव्य होते. ज्या ठिकाणी त्या वास्तव्याला होत्या,तिथे दरवर्षी भक्तगण त्यांचा पुण्यतिथी सोहळा आयोजित करतात. ता.18 नोव्हेंबरपासून रोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत भजन आणि आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच 24 रोजी आर्शिवचन आणि प्रवचन सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित केले आहे. यावेळी श्रीशैल हिरेमठ (मंगलूर), मल्लिकार्जून उपर (विजापूर) आणि शशीकांत पडसलगी ( अथणी) यांची प्रवचने होणार आहेत. त्यानंतर आरती आणि पुष्पांजली होऊन महाप्रसाद दिला जाणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत शिवलिंगव्वा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment