Monday, November 12, 2018

एप्रिल 2019 पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत पास

जत,(प्रतिनिधी)-
राज्य शासनाने सांगली जिल्ह्यातील जतसह पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाने या भागातील तांत्रिकव्यावसायिक तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दुसर्या शैक्षणिक सत्रासाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली आहेमहामंडळाने तसे आदेश नुकतेच जारी केले आहेत.
महामंडळाने सांगली जिल्ह्यातील जतसह आटपाडी,कडेगाव,कवठेमहांकाळ,खानापूर,पलूस आणि तासगाव या सात तालुक्यातील विद्यार्थ्यांना दुसर्या शैक्षणिक सत्रातील प्रवासासाठी मोफत पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहेविद्यार्थ्यांना मासिक पासमध्ये66.67 टक्के सवलत दिली जाते.उर्वरीत33.33 टक्के रक्कम भरून घेतली जाते.मात्र हे तालुके दुष्काळी जाहीर केल्याने दुसर्या सत्रात म्हणजे 15 नोव्हेंबर 2018 ते 15 एप्रिल 2019अखेर कुठल्याच प्रकारची रक्कम भरून घेतली जाणार नाहीया कालावधीसाठी मोफत पास दिले जाणार आहेतविद्यार्थ्यांनी यासाठी जत आगाराशी संपर्क साधावाअसे आवाहन आगारप्रमुखांनी केले आहे.

No comments:

Post a Comment