Sunday, November 18, 2018

जत येथे 24 व 25 रोजी जिल्हा कुस्ती निवड चाचणी

जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र केसरी सांगली जिल्हा निवड चाचणी पुरुष व महिलांच्या कुस्ती स्पर्धा 24  व  25 नोव्हेंबर रोजी अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानच्या वतीने जत येथे आयोजित करण्यात आले आहेत . अशी माहिती सांगली जिल्हा तालिम संघाचे सदस्य प्रभाकर जाधव यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली .
          सदरच्या स्पर्धा सांगली जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने होणार आहेत . यावेळी जिल्हास्तरीय सीनियर महिला ओपन 17  वर्षाखालील कुस्ती स्पर्धा होणार आहेत .जत तालुक्यात प्रथमच महिला कुस्ती स्पर्धा होत आहेत. त्यामुळे महिला खेळाडू आणि प्रेक्षकानी उपस्थित रहावे .या स्पर्धा सर्वासाठी खुल्या असणार आहेत . पुरुष व महिलांच्या सुमारे दोनशे कुस्त्या यावेळी होणार आहेत . महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष पै.नामदेवराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली या कुस्ती स्पर्धा होणार आहेत. या कुस्त्यांचे निवेदन पै. शंकर पुजारी व पै. कृष्णा शेंडगे करणार आहेत . क्रीडा शिक्षक संघटना सांगली व कुस्ती प्रशिक्षण केंद्र कुंभारी (ता.जत ) हे या कुस्त्याचे नियोजन करणार आहे .या कुस्त्याचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप व खासदार संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . तर बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी डॉ. डी .वाय. पाटील ,आमदार सतेज उर्फ बंटी पाटील , संग्रामसिंह देशमुख , हिंदी केसरी सुनील साळुंखे ,चंद्रहार पाटील , मिलिंद कोरे , दीपक शिंदे , सुशिला तावंशी , व तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.25 रोजी जिल्हा कुस्ती

No comments:

Post a Comment