Saturday, November 17, 2018

चर्मकार समाजाचा 25 रोजी वधू-वर मेळावा सांगलीत


जत,(प्रतिनिधी)-
सांगलीतील चर्मकार समाज सेवा मंडळाच्यावतीने 25 नोव्हेंबर रोजी दैवज्ञ समाज भवनात 21 व्या पालक व वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सकाळी 11 वाजता हा मेळावा सुरु होणार आहे. या मेळाव्याचा लाभ महाराष्ट्रातील सर्व चर्मकार समाजातील विवाहेच्छुक वधू-वर व त्यांच्या पालकांनी घ्यावा असे आवाहन अध्यक्ष पी. डी. शेजाळ यांनी केले आहे. मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी फोटो, माहिती, मंडळाचा नोंदणी अर्ज भरून द्यावा, समाजातील विधवा-विधुर व अपंग यांनाही सहभागी होता येणार आहे.

No comments:

Post a Comment