Friday, November 16, 2018

लिपिकांचे 27 नोव्हेंबरला आझाद मैदानावर धरणे आंदोलन


जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेच्या वतीने येत्या 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यभरातून एक लाख लिपिक सहभागी होणार आहेत.
लिपिकवर्गीय कर्मचार्यांवर चार, पाच आणि सहाव्या वेतन आयोगामध्ये झालेला अन्याय दूर करण्यासाठी राज्यातील जवळपास सर्वच संघटनांच्या प्रतिनिधींनी शासनाकडे दाद मागितली आहे़ परंतु संघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याने राज्यातील सर्वच विभागांतील लिपिक संवर्गीय कर्मचारी एकत्र येऊन शासनाकडे दाद मागणार आहेत़ शासनाच्या सर्व योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कर्मचारी करीत असतात आणि याच वर्गाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सहाव्या वेतन आयोगामध्ये सुधारणा करून सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसह राज्यातील एक लाख लिपिक 27 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करणार आहेत. समान काम समान वेतन या धर्तीवर सर्व स्तरावरील लिपिकांचे वेतन एकसमान करणे़ जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करणे़ सर्व कार्यालयांतील लिपिक संवगार्ची रिक्त पदे तत्काळ भरावीत़ सुधारित आकृतिबंध लागू करताना बाह्य यंत्रणेमार्फत, कंत्राटी न करता ती स्थायी स्वरूपाची निर्माण करण्यात यावीत़ मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे पदनाम सारखे करावे़ अर्जित रजा साठविण्याची कमाल मयार्दा काढून टाकावी़ यासह इतरही मागण्या या हक्क परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment