Friday, November 30, 2018

जतला ज्ञानेश्वर व्याख्यानमाला सोमवारी 3 पासून

जत,(प्रतिनिधी)-
जत येथील रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञानेश्वर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून व्याख्यानमाला सोमवारी ता.3 ते बुधवार ता.5 डिसेंबर या कालावधीत रोज सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत होणार आहे, जतवासियांनी लाभ घ्यावा , असे आवाहन मुख्याध्यापक व्ही. पी. बोराडे यांनी दिली.

सोमवारी ता.3 डिसेंबर रोजी व्याख्यानमालेचे पाहिले पुष्प खंडू डोईफोडे (बार्शी) हे गुंफणार आहेत. त्यांचा विषय आहे,'छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा महाराष्ट्र '. ता.4 रोजी दुसरे पुष्प गणेश शिंदे (पुणे) हे गुंफणार असून त्यांचा 'जीवन सुंदर आहे' हा व्याख्यानाचा विषय आहे. तिसऱ्या दिवशी ता.5 रोजी  प्रसिध्द संत अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे(पुणे) हे 'ज्ञानदेवे रचिला पाया' या विषयावर तिसरे व्याख्यानमालेचे पुष्प गुंफणार आहेत. सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या दरम्यान ही व्याख्यानमाला पार पडणार आहे.
यंदाचे हे व्याख्यानमालेचे 24 वे वर्ष असून जत सारख्या दुष्काळी आणि ग्रामीण भागातील आध्यात्मिक व्यासपीठ म्हणून या व्याख्यानामालेकडे पाहिले जाते. यापूर्वी प्रा. सु. ग. शेवडे, प्राचार्य शिवाजीराव भोसले ,दादामहाराज मनमाडकर,अनंत दीक्षित, डॉ. यु. म. पठाण, बाबामहाराज सातारकर, विश्वेस बोडस आदी दिग्गज मंडळींनी या व्यासपीठावर व्याख्यान दिले आहे.

No comments:

Post a Comment