Friday, November 16, 2018

विभागातील 82 नायब तहसीलदारांच्या बदल्या


 जत,(प्रतिनिधी)-
पुणे विभागातील पाच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 82 नायब तहसीलदारांच्या महसूल विभागाने बदल्या केल्या आहेत. तसेच निवडणुकीशी संबंधित या व्यतिरिक्त काही पदे रिक्त राहणार असल्यास ती पदेही तातडीने भरण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
महसूल विभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या कामांच्या दृष्टीने नायब तहसीलदार हे महत्त्वाचे पद मानले जाते. राज्य शासकीय कर्मचार्यांच्या बदल्यांचे धोरणानुसार पुणे विभागातील पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी परिपत्रकाद्वारे काढले. या बदल्यांमध्ये  जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्ह्यांतील तहसील आणि प्रांत कार्यालयातील 24 नायब तहसीलदारांचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकांची प्रशासासनाने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बदल्या झालेल्या नायब तहसीलदारांनी तत्काळ नियुक्ती मिळालेल्या ठिकाणी रुजू व्हावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment