Saturday, November 10, 2018

अग्रणी प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर


शांतीलाल मांगले यांना साहित्य साधना;डॉ. प्रकाश जोशी यांना समग्र वाड्मय पुरस्कार
जत,(प्रतिनिधी)-
अग्रणी प्रतिष्ठानचे विविध साहित्य पुरस्कार जाहीर झाले असून साहित्य साधना पुरस्कार शांतीनाथ मांगले (बलवडी,सांगली) तर अग्रणी समग्र वाड्मय पुरस्कार डॉ. प्रकाश जोशी (ठाणे) यांना मिळाला आहे.येत्या 25 नोव्हेंबर रोही देशिंग हरोली (ता. कवठेमहांकाळ) येथे होणार्या 16 व्या अग्रणी साहित्य संमेलनात हे पुरस्कार वितरीत केले जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, कवी दयासागर बन्ने यांनी दिली.
अग्रणी प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी कथा,कवितासंग्रहांसह विविध साहित्य प्रकारास पुरस्कार दिले जातात.यंदा राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार राजश्री बर्वे (मुंबई)यांच्या मोठी तिची सावली या पुस्तकास मिळाला आहे. विशेष पुरस्कार डॉ.दिलीप शिंदे (सांगली) यांच्या चिखलाचे पाय तसेच विजय जंगम (सांगली)यांच्या गावपांढरी या पुस्तकांना मिळाला आहे. राज्यस्तरीय अग्रणी उत्कृष्ठ काव्यसंग्रह पुरस्कार डॉ. राजेंद्र माने (सातारा) यांच्या जाणिवेच्या प्रदेशात या पुस्तकाला मिळाला आहे. विशेष पुरस्कार संध्या रंगारी (हिंगोली)यांच्या वाताहतीची कैफियत आणि धनाजी घोरपडे (सांगली) यांच्या गार्हाणं या संग्रहाला मिळाला आहे.
याचबरोबर देशिंग भूषण पुरस्कार शामराव शेंडे (हरोली) यांना जाहीर झाला आहे. साहित्य साधना पुरस्कार शांतीनाथ मांगले (बलवडी, सांगली) तर राज्यस्तरीय अग्रणी समग्र वाड्मय पुरस्कार डॉ.प्रकाश जोशी (ठाणे) यांच्या भूतपाठी राजकारण या पुस्तकाला मिळाला आहे. राज्यस्तरीय अग्रणी युवा वाड्मय पुरस्कारही दिले जात असून अमृत तेलंग ( आंबुलगा,नांदेड) यांच्या पुन्हा फुटतो भादवा आणि शांताराम खामकर ( अहमदनगर) यांच्या भवताल या पुस्तकांना हे पुरस्कार मिळाले आहेत.परीक्षक म्हणून मनीषा पाटील, सुरेखा कांबळे,भरत खराडे, संगीता इंगळे यांनी काम पाहिले.No comments:

Post a Comment