Wednesday, November 21, 2018

शेगाव येथे सशस्त्र दरोडा

मारहाण करुन पाच लाखाचा ऐवज लंपास
जत,(प्रतिनिधी)-
          जत तालुक्यातील  शेगाव येथे साहेबराव विठ्ठल शिंदे यांच्या घरावर मंगळवारी रात्री २.५० दरम्यान सशस्त्र दरोडा पडला.हा दरोडा पाच ते सातजाणानी रिव्हालवराचा धाक दाखवून धक्काबुक्की मारहाण करत तोंड दाबून तीन लाख रोख रक्कम व सात तोळे सोन्याचे दागिने,सॅमसॅग व अॅपो कंपनीचे दोन  मोबाईल सीसीटीव्ही फुटेजचे अॅड्याप्टर असा ऐवज सहा  लाख रुपयेचा ऐवज साहेबराव शिंदे व त्यांच्या पत्नी वर्षाराणी शिंदे यांना मारहाण करुन लंपास केला. 
           याबाबत अधिक माहिती अशी की साहेबराव शिंदे यांचे शेगाव येथे सिमेंट विट व पल्बिंग साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे.ते शेगाव ग्रामपंचायत सदस्य आहेत. ते शेगावात आपली पत्नी व दोन मुले सह राहतात.नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री शिंदे कुटूंबीय आपल्या घरी झोपेत असतानाच रात्री तीन वाजणेच्या सुमारास दरवाजा वाजण्याच्या आवाज साहेबरावाना आला. काही समजण्याच्या आताच चोरट्यांनी दरवाजावर मोठा दगड टाकून दरवाजा फोडला व पाच ते सात तरुण चोरट्यांनी आत प्रवेश केला. पाच ते सातजणानी पायात पांढरे बुट ,हातात  मोजे काळे जरकीन तोंडाला पांढरा कपडे  घेतले होते.या चोरट्यांनी  पती व पत्नीस मारहाण करत वर्षाराणी यांच्या गळातील दगिने (मणी   मंगळसूत्र ,कानातील कर्णफुले ,हातातील बांगड्या,व साहेराब यांच्या हातातील अंगठ्या व मोबाईल हिसाकावून घेतले .व साहेराब यांच्या डोक्याला रिव्हालवर डोक्याला लावत तीन लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली.यावेळी झालेल्या मारहाणीत साहेबराव व त्यांच्या पत्नीच्या हाताला ,पाठीत गंभीर जखमा केली आहे. दरोडाखोराना आत येऊन एका अनोळखी चोरट्यांन दरवाजाजवळ येऊन सांगितले शेजाराची माणसे जागी झाली आहे.त्यामूळे दरोडेखार्यानी पळ काढला.
              दरोडा घालतेवेळी सीसीटीव्ही कॅमेराचे तोंड बाजूला फिरवले.हा प्रकार सुमारे अर्धा तास सुरु होता .याबाबत साहेबराव शिंदे यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे .पोलिस उपअधिक्षक अमरसिंह निंबाळकर  ,पोलिस निरीक्षक अशोक भवड यांनी घटनास्थळी भेट दिली.श्वानपथकास पाचारण केले असता घटनास्थळापासून पश्चिमेला दोनशे मीटर अंतरावर घुटमळाले  व ठसेतज्ञ यांनी ठसे घेतले.

No comments:

Post a Comment