Thursday, November 22, 2018

जतमध्ये हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त


जत,(प्रतिनिधी)-
प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने काल जतमध्ये कारवाई करत हातभट्टीच्या दारू आणि ताडीचा साठा करणार्या दोघांना अटक केली. हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली असून दारू, ताडी, रसायन असा 73 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी पत्रकारांना दिली. जतमधील उमराणी रस्त्यालगत राहणार्या संजय मारुती सरगर याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे 50 लिटर दारू आणि 800 लिटर दारू तयार करण्याचे रसायन सापडले आहे. तालुक्यातील बिळूरमध्ये ताडी विक्रेता यमनाप्पा महालिंग भंडीवार याला पकडून 700 लिटर ताडीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment