Tuesday, November 13, 2018

यशस्वी विद्यार्थ्यांचा गुगवाडला गौरव

जत,(प्रतिनिधी)-
बिळूर जिल्हा परिषद गटातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये दहावी इयत्तेत यशस्वी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव  (ता.जत) येथे प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, पंचायत समिती सभापती सौ. सुशीला तावंशी यांच्याहस्ते करण्यात आला. या गौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य अ‍ॅड्.सी. आर. सांगलीकर होते.
     बिळूर जि.प. गटातील सर्व माध्यमिक शाळांमधील शाळा पातळीवर पहिल्या तीन क्रमांकात आलेल्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक अ‍ॅड्. सांगलीकर म्हणाले की, द्विभाषिक गावांमध्ये शिक्षण घेऊन प्रगती करणे कठीण आहे.मात्र या परिसरातील विद्यार्थी कष्टाळू आहेत. त्यांच्यासाठी गुगवाड येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे,याचा लाभ घ्यावा. यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, सौ. अपर्णा अथणीकर, प्रभाकर सनमडीकर, शिवाप्पा तावंशी, हनिफ मिरजकर, शंकर कांबळे, किशोर बामणे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment