Wednesday, November 28, 2018

कोळगिरीत शेतकऱ्याची आत्महत्या


जत,(प्रतिनिधी)-
कोळगीरी (ता. जत) येथील शिवाजी सिद्धाप्पा पुजारी (वय 50) या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवाजी यांचा मुलगा सिद्धाप्पा शिवाजी पुजारी यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी, शिवाजी सिद्धाप्पा पुजारी गावालगत असलेल्या भैरवनाथ देवाचे पुजारी आहेत. मंदिराची सुमारे 52 एकर जमीन आहे. देवाची पूजा करून ते शेत जमीन कसत होते.  आज दुपारी मंदिर परिसरात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना घरातील नागरिकांनी पाहिल्यानंतर गावकामगार पोलीस पाटील सचिन बिराजदार यांना त्यांनी सदरची माहिती दिली. त्यांनी यासंदर्भात पोलिसांना कळविले. शिवाजी पुजारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संजय माने करत आहे. या आठवड्याभरात शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे.

No comments:

Post a Comment