Monday, November 12, 2018

संख अप्पर तहसीलकडून साडे चौतीस लाखांचा महसूल वसूल

जत,(प्रतिनिधी)-
 वाळू तस्करीवर पायबंद घालताना संख अप्पर तहसील कार्यालयाकडून साडेचौतीस लाखांचा महसूल गोळा करण्यात आला आहेयामुळे काही प्रमाणात जत पूर्व भागात वाळू तस्करीला आळा बसला आहे.
गेल्या वर्षी जत तालुक्यातील संख येथे नव्याने अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले होतेतालुक्यातील पूर्व भागातील लोकांना शासकीय कामांसाठी सोयीचे व्हावे,यासाठी तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी होती.या भागातील नदी आणि ओढा पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत आहेया कार्यालयामुळे काही प्रमाणात आळा बसल्याचे कारवाईमुळे दिसून येत आहेजानेवारी ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत अनधिकृत गौण खनिज वाहतूक करीत असताना पकडण्यात आलेल्या वाहनांना 72 लाख 22हजार 375 रुपये इतक्या दंडाची आकारणी करण्यात आली आहेयापैकी 34 लाख 45हजार 225 रुपये इतका दंड चलनाने वाळू तस्करीचा शासनाने जमा झाला आहे.
अनधिकृत गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणार्या एकूण सहा जणांवर जत व उमदी पोलिस ठाण्यांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेततसेच अनधिकृतपणे वाळूसाठा केलेल्याप्रकरणांतून 92 ब्रास इतका वाळू साठा जप्त करण्यात आला होतात्यापैकी 70 ब्रास वाळूचा जाहीर लिलाव करून त्यामधून 3 लाख 14हजार 416 रुपये इतका महसूल शासनाला जमा करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment