Thursday, November 15, 2018

रविवारी मिरज येथे सरपंचांचा जिल्हा मेळावा


जत,(प्रतिनिधी)-
पंचायत राज विकास मंच आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या जिल्हा शाखेच्यावतीने रविवारी दि. 18 रोजी मिरज येथील प्रगती पॅलेस मल्टीपर्पजच्या हॉलमध्ये सकाळी 11 वाजता सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी ग्रामपंचायत सक्षमीकरणासाठी व सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या मानसन्मानासाठी आणि मार्गदर्शनासाठी जिल्हा मेळावा आयोजिअत करण्यात आला असून मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील (कुर्डुकर) राहणार आहेत. यावेळी उपाध्यक्ष दत्ता काकडे, कैलास गोरे, शशिकांत मोरे, सुहास चव्हाण, सागर माने, सौ.राणी पाटील, ॅड्. विकास जाधव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गावाच्या विकासासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातील सरपंच,उपसरपंच आणि सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कोडग, जिल्हा संघटक नानासाहेब भोसले, महिला जिल्हाध्यक्षा सौ. रुपाली यादव आणि जिल्हा कार्याध्यक्षा सौ. वृषाली पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment