Monday, November 12, 2018

जत शहरात वॉटर एटीएम सुरू करण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
जत शहराला होत असलेला दूषित पाण्याचा पुरवठा लक्षात घेऊन शहरातील निम्म्यापेक्षा अधिक नागरिक विकतचे पाणी पित आहेत.त्यामुळे पाणी विकणार्या लोकांना धंदा चांगलाच फोफावला आहेकोण कशीही पाण्यावर आकारणी करून नागरिकांना लुटत आहेतत्यामुळे नगरपालिकेनेच माफक दरात शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा,यासाठी वॉटर एटीएम केंद्रे उभी करावीतअशी मागणी होत आहे.
डिझेलचेविजेचे दर वाढल्याचे कारण देत अनेक शुद्ध पाण्याची विक्री करणार्या लोकांनी मन मानेल तशा दराने पाण्याची विक्री करत आहे.अलिकडच्या काही वर्षात शहरात सतत कोणत्या न कोणत्या साथीच्या आजाराचा फैलाव होत आहेजत शहराला पुरवठा करण्यात येणारा पाणीपुरवठा हा जुजबी शुद्धीकरण प्रक्रियेतून केला जातोपाण्याला दुर्गंधी,गढूळता यामुळे सर्रास नागरिक या पाण्याचा वापर पिण्यासाठी न करता अन्य कामासाठी करतातपिण्यासाठी खासगी शुद्धीकरण केंद्रांमधून पाणी आणले जाते किंवा मागवले जातेमुळात शहराला आठवड्यातून फक्त दोनवेळा पाणीपुरवठा केला जातोत्यामुळे शहरातल्या खानावळीहॉटेलांना रोज पाणी पुरवठा करणार्यांची चलती आहेकाही लोक ट्रॅक्टरद्वारे पाणी आणून पुरवतातही मंडळी मन तशी पाण्यासाठी आकारणी करतातयामुळे लोकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
शहरातले लोक पाणीपट्टी भरतातअलिकडच्या काळात यात मोठी वाढही झाली आहेपण त्यानुसार शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात नाहीत्यामुळे नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहेतशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहेपण यात ते अपयशी ठरत आहेतनिदान शहरात जागोजागी वॉटर एटीएम उभारून माफकत दरात शुद्ध पाण्याचा पुरवठा करावाअशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment