Tuesday, November 13, 2018

दीपक लंगोटे सरपंच परिषदेचे तालुका संपर्कप्रमुख

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील जिरग्याळ येथील सरपंच दीपक लंगोटे यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या तालुका संपर्कप्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. परिषदेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कोडग यांनी यांना निवडीचे पत्र दिले.
     पंचायत राज विकास मंचअंतर्गत गावोगावच्या सरपंचांचे प्रश्‍न सोडवणे, गावाच्या विकासाच्यादृष्टीने मार्गदर्शन करणे शिवाय गावांना अधिकाधिक विकास निधी खेचून आणण्याचे काम परिषदेच्या माध्यमातून केले जात आहे. सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती ओढवली असून याबाबत काय उपाययोजना कराव्यात यासाठी आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. या कामी सरपंच श्री.लंगोटे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार असल्याचे श्री. कोडग म्हणाले. परिषदेच्या बैठकीत श्री.लंगोटे यांना तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांच्याहस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.तालुक्यातील सरपंचांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण क्रियाशील राहू, असे श्री. लंगोटे म्हणाले.

No comments:

Post a Comment