Monday, November 12, 2018

कार्तिकवारीच्या दिंड्या निघाल्या

जत,(प्रतिनिधी)-
कर्नाटकातील अथणी,जमखंडीहारुगिरी,निपाणी या भागातून पंढरपूरच्या कार्तिक यात्रेसाठी वारकर्यांच्या दिंड्या निघाल्या आहेत.या दिंड्यांचे आगमन जत तालुक्यात झाले असून अथणी ते शेगाव या मार्गातील गावे गजबजली आहेत.
कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पंढरपूरच्या श्री विठ्ठलच्या कार्तिक यात्रेला वारकरी जात असतातयामुळे जत तालुक्यातील गुगवाड,बसर्गीबिळूरजतशेगाव आणि सिंगनहळ्ळी या मार्गातील रस्ते आणि गावे गजबजलेली असतातअथणी-जत-सांगोलामार्गे वारकरी पंढरपूरला जात असतातजत तालुक्यातील वाटेत येणार्या गावांमधील काही भाविक अशा वारकर्यांच्या भोजनाची आणि निवासाची दरवर्षी सोय करीत असतातकर्नाटकातील वेगवेगळ्या गावांमधील दिंड्यांचे मुक्काम करण्याचे नियोजन ठरलेले असतेत्यानुसार जत तालुक्यातील गुगवाडबसर्गीबिळूर,शेगाव आणि सिंगनहळ्ळी गावांमध्ये विठ्ठल भक्त या वारकर्यांची सोय करतातजत शहरात शिवानुभव मंडपदत्त मंदिर यांच्यासह काही भाविक स्वतंत्रपणे अशा वारकर्यांची भोजनाची व निवासाची सोय करतातया काळात रात्री भजन,कीर्तनाचे कार्यक्रम होत असतातयामुळे कार्तिक एकादशीपर्यंत वातावरण भक्तिमय झालेले असते.

No comments:

Post a Comment