Thursday, November 29, 2018

संदीप मोटे ठरला जत अजिंक्यतारा केसरीचा मानकरी


 जत,(प्रतिनिधी)-
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व सांगली जिल्हा तालीम संघ व अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कंठी (ता. जत) येथील संदीप मोटे यांनी जत अजिंक्यतारा केसरीचा मानकरी ठरला असून त्याची महाराष्टृ केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खासदार संजय पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव, जिल्हा परिषद सदस्य स्नेहलता जाधव, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते, सभापती सुशीला तावशी, पांडुरंग सावंत, माजी सभापती संजय सावंत, श्रीकांत देशमुख, शिवाजीराव ताड, प्रसिद्ध उद्योगपती सुधाकर भोसले, खवसपूरचे वस्ताद भारत भोसले, श्रीशैल कोटगों, डी. बी. माळी, संगप्पा पाटील, तुकाराम ईरकर, हनुमंत माने, वैभव सूर्यवंशी, पै. कृष्णा शेंडगे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment