Monday, November 19, 2018

सीईटी यंदा ऑनलाइन


 जत,(प्रतिनिधी)-
 राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, कृषीच्या पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्षाला प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा यावर्षीपासून ऑनलाइन घेण्यासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले आहे. त्याकरिता ऑनलाइन सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम व गुणांची विभागणी कशी असणार आहे, याबाबतचे परिपत्रक राज्य सीईटी सेलने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
त्यानुसार आता विद्यार्थ्यांना सीईटीला सामोरे जावे लागणार आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, कृषीच्या पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेशासाठी यापूर्वी सीईटी परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येत होती. दरम्यान, यंदाची सीईटी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत सीईटी सेलद्वारे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार परीक्षा ऑनलाइन स्तरावर घेण्याबाबत सीईटी सेलद्वारे विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याकडून सीईटी ऑनलाइन घेण्याबाबत 15 नोव्हेंबरपर्यंत प्रतिक्रिया मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सीईटी सेलद्वारे परीक्षा ऑनलाइन सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने अभ्यासक्रम व गुणांच्या पद्धतीमध्ये बदलाची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, गतवर्षीप्रमाणे सीईटी अभ्यासक्रमाचे स्वरूप व रचना केली आहे. ऑनलाइनद्वारे होणार्या सीईटीत निगेटिव्ह पद्धत राहणार नाही. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे जेईई मेनच्या धर्तीवर ही परीक्षा होणार आहे.


No comments:

Post a Comment