Monday, November 12, 2018

विजापूर-गुहागर मार्गावर जतजवळ एकजण ठार

जत,(प्रतिनिधी)-
विजापूर-गुहागर रस्त्यावर एमआयडीशी जवळ रस्ता कामाचे पाण़्याचे टँकर अंगावरून गेल्याने डांळीब व्यापारी जागीच ठार झाला.संजय रंगराव रुपनूर (वय-39,रा.नागज ता.कवठेमहाकांळ) असे ठार झालेल्याचे नाव आहे.घटना सोमवारी सांयकाळी घडली.
अधिक माहिती अशी,नागज  येथील डाळिंब व्यापारी संजय रुपनूर व त्याचा मित्र महादेव शिवाजी खोत (रा.नागज ) हे दरिबडची येथील डाळींब बाग खरेदीसाठी दुचाकी(एमएच-10,टी-5511) वरून आले होते.बागेचा व्यवहार करून नागजला परतत असताना जत शहराजवळील एमआयडीजवळ विजापूर -गुहागर मार्गाच्या कामाचा भरधाव वेगाने येणारा पाण्याचा टँकर (क्र.केए-२०,ए-५०७२ ) ने समोर धडक दिली.त्यात संजय रूपनूर यांच्या अंगावर  टँकरचे चाक गेल्याने  त्यांचा जागीच मृत्यु झाला.तर पाठीमागे बसलेला महादेव खोत हा बाजूला पडल्याने वाचला आहे.दरम्यान डांळिब व्यापारी रूपनूर हे जत,सांगोला,कवठेमहाकांळ तालुक्यातील डाळींब बागा  खरेदी करून कमिशनवर व्यापाऱ्यांना देत होते. त्यांचे जत तालुक्यात  कायम येणे-जाणे होते.सोमवारी त्यांच्यावर नियतीने घाला घातला.त्यांच्या पश्चात आई,एक भाऊ,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे. रूपनूर यांच्या आकस्मिक निधनाने नागज  गावात शोककळा पसरली आहे.
दरम्यान महामार्गाचे काम करताना वाहन चालकांच्या सुरक्षितेचे नियम संबधित ठेकेदारांकडून पाळले गेले  नाहीत.कामावर  कोठेही उकरले  जाते,कोठेही मरूम टाकण्यात येत आहे.कुठेही खड्डे  निर्माण केले आहेत.कुठेही पाणी मारून दलदल केली जात आहे. त्यामुळे रस्त्यावर सर्वच ठिकाणी अपघात  परिस्थिती निर्माण होत आहे.

No comments:

Post a Comment