Tuesday, November 27, 2018

जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीवर निर्बंध


ग्रामविकास खात्याचा आदेशराज्यात 9500 उमेदवार प्रतीक्षेत
जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील सरळसेवा भरती प्रक्रिया पूर्ण होईल,त्यावेळी अनुकंपाची पदे जिल्हा परिषदेत भरण्यात यावीतअसा निर्णय घेण्यात आला आहेत्यामुळे साहजिकच अनुकंपा भरतीच्या प्रतीक्षेत असणार्या हजारो उमेदवारांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वास्तविक राज्यातल्या 34 जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या अनुकंपा भरतीसाठी 9 हजार 500 उमेदवार प्रतीक्षा यादीत आहेत.

 राज्य सरकार आणि जिल्हा परिषदांमध्ये 30 टक्के म्हणजे तब्बल 4 लाख 50हजार पदे रिक्त असल्याचे सांगण्यात येतेयात जिल्हा  परिषदेकडील  34  हजार रिक्त पदांचा समावेश आहेएकूण राज्यातल्या रिक्त जागांपैकी 72 हजार पदांची मेगा भरती दोन वर्षात भरण्याची घोषणा विधिमंडळात सरकारने केलीमात्रआरक्षणशैक्षणिक संस्थांचा विरोध अशा अनेक कारणांमुळे भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाहीआता ही मेगा भरतीची प्रक्रिया कधी पूर्ण होईल आणि प्रत्यक्षात भरती कधी होईलहे सांगणे कठीण आहेकारण आणखी महिनाभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहेसाहजिकच अनुकंपा भरती प्रक्रियेलाही सरकारच्या निर्णयामुळे खोडा बसला आहे.
या रखडलेल्या भरतीमुळे अनुकंपाधारक उमेदवार आणि त्यांच्या पालकांना मात्र वारंवार जिल्हा परिषदेंच्या चकरा मारून हकनाक त्रासाला सामोरे जावे लागत आहेज्यावेळी पद भरती होईल,त्याचवेळी ही भरती होईलएकूण भरतीयोग्य पदाच्या केवळ दहा टक्केच पदे भरता येतील.दरम्यानअनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडण्याचा प्रश्न निर्माण होणार आहेअनुकंपाची सध्याची वयोमर्यादा 45 इतकी आहेमागील दोन-तीन वर्षांपासून अनुकंपा भरती झालेली नाहीशेकडो उमेदवार प्रतीक्षा यादीत अपात्र ठरले आहेतसरकारने जिल्हा परिषदेअंतर्गत येणार्या भरती प्रक्रियेवरील निर्बंध उठवून अनुकंपा धारकांना दिलासा द्यावाअशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांनी केली आहे

No comments:

Post a Comment