Tuesday, November 20, 2018

उपसभापती शिवाजी शिंदे यांचा राजीनामा

जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समिती उपसभापती शिवाजी शिंदे यांचा राजीनामा सभापती सुशिला तावंशी  यानी आज  मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली यांच्याकडे सादर केला आहे.                   जि.प. कडून यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी याना प्राप्त झाल्यानंतर नवीन उपसभपती निवडीचा कार्यक्रम जाहीर करून पं.स.सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात येणार  आहे.
               उपसभापती शिवाजी शिंदे यांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे . या रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस व जनसुराज्य युतीचे  सदस्य अँड. आडव्याप्पा घेरडे यांची निवड  होण्याची शक्यता आहे . पंचायत समिती मध्ये भाजपा व विकास आघाडी यांची संयुक्त सत्ता आहे . भाजप  ९ , काँग्रेस  ७ , जनसुराज्य एक , वसंत दादा विकास आघाडी एक याप्रमाणे पक्षीय बलाबल आहे , नुकत्याच झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत जनसुराज्य व काँग्रेस पुरस्कृत उमेदवार अँड. आडव्याप्पा घेरडे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता . त्याच्या बदल्यात घेरडे यांना उपसभापती पदाची संधी भाजपाकडून मिळणार आहे असे समजते.
       मावळते उपसभपती शिवाजी शिंदे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले की, मागील दिड वर्षात पक्ष , गटतट बाजूला ठेवून विकास कामाला मी प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात पं.स.सदस्य म्हणून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सभागृहात प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment