Friday, November 16, 2018

पाण्याचे टँकर मंजुरीचे अधिकार तालुक्याला द्या

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात भयानक चारा व पाणी टंचाई निर्माण झाली आहे . पिण्याच्या पाण्याचा टँकर मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी सांगली यांना असल्यामुळे टँकर मंजूर करण्यास विलंब होत आहे . त्यामुळे सदर टँकर मंजुरीचे अधिकार तालुका पातळीवर  प्रांताधिकारी किंवा तहसीलदार यांना देण्यात यावेत असा ठराव जत पंचायत समिती मासिक बैठकीत एकमताने संमत करण्यात आला . बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती सुशिला तावंशी होत्या .
       पाणी टंचाई जाणवत असलेल्या गावाचे सर्वेक्षण करून टँकर मागणी करणारा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून द्यावा लागत आहे. त्यानंतर टँकर मंजूर होणार आहे. सदरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विलंब होणार आहे. प्रस्ताव  दिल्यानंतर नागरिकांना एक महिन्यानंतर पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. प्रशासनाने जनतेची  होणारी गैरसोय लक्षात घेऊन नियमात सुधारणा करून घ्यावी असा ठराव सभगृहात एकमताने समंत करण्यात आला.
        पंचायत समिती मासिक बैठकीत झालेल्या ठरावाची आमंलबजावणी प्रशासनाकडून होत नाही अशी खंत सदस्यांनी सभगृहात व्यक्त केली . यापुढील काळात तरी पंचायत समिती प्रशासनाकडून सभगृहात झालेल्या ठरावाची व चर्चेची आमंलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सदस्यांनी सभागृहात केली असता त्यावर उपाय योजना करण्यात येईल असे अश्वासन गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली .
         तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. टंचाई कालावधीत गावकामगार तलाठी व ग्रामसेवक यानी नेमणूक असलेल्या सजात किंवा गावात मुक्काम करणे आवश्यक आहे. यामुळे शासनाला तालुक्यातील वस्तुस्थिती समजणार आहे . तलाठी व ग्रामसेवक सध्या तालुक्याच्या ठिकाणी रहात आहेत. यामुळे शासनाला चुकीची माहिती सादर होण्याची शक्यता आहे .महसूल प्रशासनाने याची आमंलबजावणी करावी असा ठराव एकमताने समंत करण्यात आला .
     सभागृहात  रस्ते , आरोग्य , पाणीटंचाई घरकुल  ,प्राथमिक शिक्षण , अंगणवाडी, दळणवळण , चाराटंचाई ,विज वितरण , इत्यादी विषयावर  चर्चा झाली या चर्चेत अँड. आडव्याप्पा घेरडे, श्रीदेवी जावीर, मंगल जमदाडे ,अर्चना पाटील, आप्पासाहेब मासाळ , रवींद्र सावंत , उपसभापती शिवाजी शिंदे , मनोज जगताप यांनी भाग घेतला .

No comments:

Post a Comment