Tuesday, November 13, 2018

मक्याची कमी दराने खरेदी

जत,(प्रतिनिधी)-
संकटे आली की, एकामागून एक येतात, याचा अनुभव सध्या जत तालुक्यातल्या शेतकर्‍यांना येत आहे. तालुक्यात पाऊस झाला नसल्याने अनेक संकटांचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना आता मक्याला आधारभूत किंमतीपेक्षा कमी दर मिळत असल्याने या दराचे काय करायचे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
     दोन पैसे मिळतात आणि त्याचबरोबर जनावरांना वैरण होईल म्हणून जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते. मात्र पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने मका पिकाची वाढ खुंटली. थोड्या फार प्रमाणात पाण्याची उपलब्धता असलेल्या पश्‍चिम, दक्षिण भागात काही प्रमाणात मक्याचे पीक आले आहे,परंतु व्यापारी दर्जाचे कारण सांगत आधारभूत दरापेक्षा कमी दराने मक्याची खरेदी करत असल्याने यातही शेतकर्‍यांच्या पदरी निराशा पडली आहे.
     शासनाने मक्याला 1700 रुपये क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. पण्अ व्यापारी 1300 ते 1450 रुपये असा दर देत आहेत. मका पिकासाठी केलेला उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्किल झाले आहे. शिवाय अडचणीच्या काळात मका घरात ठेऊ शकत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना कमी दराने मका विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

No comments:

Post a Comment