Monday, November 19, 2018

व्यावसायिक वाहनांसाठी ‘थर्ड पार्टी‘ विमा बंधनकारक


जत,(प्रतिनिधी)-
खासगी वाहनाबरोबरच व्यावसायिक वापराच्या नवीन वाहनांनाही आता नोंदणी करताना तीन वर्षांचा किमानथर्ड पार्टीविका काढावा लागणार आहे. हा विमा काढणे बंधनकारक असल्याचा अध्यादेश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने काढला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या सूचनेनुसार 1 सप्टेंबरपासून नवीन वाहनांसाठी काढावयाच्या विम्यात बदल करण्यात आला आहे. दुचाकीसाठी 5 वर्षे आणि चारचाकी वाहनांसाठी तीन वर्षे मुदतीचा विमा काढावा लागत आहे. समितीने भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाला त्यासंबंधीची सूचना केली होती. हा निर्णय केवळ खासगी वापराच्या वाहनांसाठी होता. त्यात व्यावसायिक वापराच्या वाहनांचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र आता व्यावसायिक वापराच्या वाहनांनाही तो नियम लागू करण्याचा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दिला आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवीन व्यावसायिक वाहनांची नोंदणी करताना तीन वर्षांच्या विम्याचे बंधन घातले आहे. दरम्यान, व्यावसायिक वाहनांच्या वापरासाठी सुरूवातीला तीन वर्षे मुदतीचा विमा काढणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे वाहतूकदारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. असे मत महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment