Monday, November 19, 2018

शामराव जवंजाळ यांचा प्राथमिक शिक्षक बँकेतर्फे सत्कार


जत,(प्रतिनीधी)-
 महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राजाध्यक्ष. शामराव जवंजाळ सांगली जिल्हा दौर्यावर आले होते. त्यांनी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक शाखा जत येथे भेट दिली. यावेळी शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष राजाराम सावंत यांनी बँकेमार्फत सत्कार केला.
त्यांच्यासोबत सोलापूरचे शिक्षक कार्यकर्ते, शेख, पठाण यांचेही सत्कार झाला. यावेळी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष संतोष काटे, पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाले, तालुकाध्यक्ष सुनिल सूर्यवंशी, सुधाकर साळे, अप्पासाहेब सौदागर, शाखाधिकारी विजय हाके, विकास साबळे, बँकेतील कर्मचारी उपस्थित होते. बँकेचे उपाध्यक्ष राजाराम सावंत बँकेच्या कर्जयोजना विषयी माहिती दिली. बँकेच्या प्रगती विषयी चर्चा झाली. यावेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु. टी. जाधव, रामराव मोहीते आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment