Friday, November 30, 2018

विद्यार्थ्यांना सरसकट लाभ देण्याची मागणी


दुष्काळग्रस्त एसटी बस पास योजना
बिळूर:
दुष्काळ पास सवलत योजने अंतर्गत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना याचा लाभ द्यावा, अशी मागणी युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन मानेपाटील यांनी केली आहे. प्रथम सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी एसटी बसचे पास काढले नाहीत ते विद्यार्थी या योजनेपासून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना आता दुष्काळग्रस्त विद्यार्थी मोफत पास योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यांचाही या योजनेत समावेश करावा अशी मागणी श्री.मानेपाटील यांनी आगाराकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एसटी बसच्या पासची मुदत ही नेहमीप्रमाणे एप्रिल अखेर असते पण दुष्काळग्रस्त पास असल्याने आणि महाराष्ट्रात पावसाळ्यास जूनमध्ये सुरू होत असल्याने सर्वच पासेसची सवलत जूनअखेरपर्यंत वाढवून देण्यात यावी. ही मागणी यात नमूद करण्यात आली आहे. याचा विचार न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment