Wednesday, November 21, 2018

विषारी औषध पिऊन विवाहितेची आत्महत्या


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील खोजनवाडी येथील मंदाकिनी सिद्धाप्पा बिराजदार (वय-23,मूळ गाव मेंढिगिरी) या विवाहितेने दाक्ष्र बागेवर मारण्यात येणारे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना काल सकाळी घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिद्धाप्पा आणि मंदाकिनी यांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. घरात किरकोळ कारणावरून भांडण झाले. नंतर सदर महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

No comments:

Post a Comment