Tuesday, November 13, 2018

बालगावला १५ पासून निवासी योग शिबीर


जत,(प्रतिनिधी)-
योगाचा जागतिक विश्वविक्रम करणारे श्री गुरूदेव आश्रम बालगाव ( अक्कळवाडी ) येथे दिनांक   १५  ते  २१ नोव्हेंबर दरम्यान तरूणांसाठी निवासी योग प्रशिक्षण शिबीर आयोजीत  करण्यात आले आहे . अशी माहिती आश्रमाचे प्रमुख श्री अमृतानंद स्वामीजी यांनी दिली. 
     श्री गुरूदेव आश्रमने जागतिक योग दिनी ग्रामीण योग उत्सवाचे आयोजन केले होते.  त्याची चार विश्वविक्रम बुकात नोंद झाली आहे.  " हर घर योगहर परिवार निरोग " हे उद्दिष्ट समोर ठेवून योगाचे विविध उपक्रम आश्रमाच्या वतीने  राबविण्यात येत आहेत. असे सांगून श्री अमृतानंद स्वमिजी पुढे म्हणाले की , तरूण पिढी हे देशाचे भवितव्य आहे.  मात्र तरूणांमध्ये व्यसनाधिनता वाढत चालली आहे. युवा वर्ग भरकटत आहे. अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले  तरुणांचे व देशाचे भवितव्य उज्वल करायचे असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. तरूणपणीच योग आत्मसात केल्यास आपले आयुष्य निरोगी व समृध्द बनेल. त्यामुळे आश्रमाने तरूणांसाठी मोफत निवासी योग प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. 
शिबीर १५  ते २१ नोव्हेंबर दरम्यान दररोज सकाळी ठराविक वेळेत होणार आहे.  शिबीरार्थींनी बुधवार दिनांक १४  रोजी रात्री मुक्कामास यायचे आहे. प्रशिक्षणार्थीसाठी मोफत भोजन व निवास व्यवस्था  आश्रमाच्या वतीने  करण्यात आली आहे. शिबीरात सहभागी होणाऱ्या तरुणांनी आपला बिछाना सोबत आणावा. या शिबीरात अनेक मान्यवरांचे मार्गदर्शनयोगाचा सखोल आभ्यास व भारतीय खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.  या संधीचा महाराष्ट्र - कर्नाटक सिमाभाग व जत तालुक्यातील  तरूणांनी लाभ घ्यावा असे अवाहन श्री अमृतानंद स्वामीजी यांनी केले आहे .


No comments:

Post a Comment