Saturday, November 10, 2018

जनावरांच्या चार्‍यासाठी दुष्काळी पट्ट्यातील ऊस राखून ठेवा


चार्यासाठी थेट अनुदानरासपच्या मागणीची दखल
जत,(प्रतिनिधी)-
जनावरांच्या चार्यासाठी शेतकर्यांना थेट अनुदान देण्याची मागणी सर्वप्रथम राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने 2 नोव्हेंबर रोजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली होती.याची दखल घेऊन पशुसंवर्धनमंत्री श्रीजानकर यांनी चार्यासाठी थेट अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र हे अनुदान तातडीने देण्यात यावेतसेच जनावरांसाठी ऊस राखीव ठेवावा,अशी मागणी रासपचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील यांनी केली आहे.
सध्या चारा टंचाईमुळे शेतकरी एकिकडे जनावरे विकत आहेत तर दुसरीकडे जनावरे मृत्यूपंथाला लागले आहेतयामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.आधीच पावसाअभावी रब्बीचा पेरा झाला नाहीआता शेतकर्यांची खरी भिस्त जनावरांवरच आहेदुग्ध उत्पादनावर उपजीविका करत असलेल्या शेतकर्यांपुढे जनावरे जगवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहेशेतकर्यांना चार्यासाठीचे थेट अनुदान लवकर न मिळाल्यास जनावरांना विकण्यावाचून पर्याय नाहीत्यामुळे अनुदान तात्काळ देण्यात यावीअशी मागणी श्री.पाटील यांनी सहकार व पशुसंवर्धन या दोन्ही विभागाच्या मंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
श्री.पाटील म्हणाले कीथेट अनुदान देण्याबरोबरच दुष्काळी तालुक्यातील ऊस कारखान्याऐवजी जनावरांच्या चार्यासाठी राखीव ठेवावादुष्काळी तालुक्यात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेहा व्यवसाय टिकून राहावा आणि जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवला जाऊ नये,यासाठी चारा लागवड करण्यासाठी अनुदान वाढवून मिळावेसध्या हेक्टरी फक्त साडेचार हजार रुपयांच्या अनुदान दिले जात असल्याचे सांगण्यात आले आहेते अत्यंत अपुरे आहे.त्यामुळे शेतकर्यांनी चारा लागवडीकडे पाठ फिरवली आहेशासनाने तात्काळ चारा अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावेअशी मागणी केली आहे.  


No comments:

Post a Comment