Tuesday, November 6, 2018

ड्रगन फ्रूट्स दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना वरदान

जत, (प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या पांडोझरी येथील कल्लप्पा पुजारी व गायत्री पुजारी या दांपत्याने कमी पाण्यावर द्राक्ष व डाळिंबालाही उत्पन्नाच्या बाबतीत मागे टाकणार्‍या ड्रॅगन फ्रुट्सचे  पीक घेऊन दुष्काळी पट्ट्यातील सर्व शेतकऱ्यांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पांडोझरी हे महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील गाव आहे. या गावात  रहाणारे कल्लप्पा व त्यांची पत्नी गायत्री पुजारी गेली अनेक वर्षे  पारंपारीक पद्धतीने शेती करीत होते.
परंतु, निसर्गाने तालुक्यावर नेहमी केलेल्या अवकृपेमुळे शेतीसाठी पाण्याची नेहमी असणारी कमतरता लक्षात घेऊन त्यांनी कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पन्न देणारे पीक कोणते आहे. याची माहिती घेतली त्यावर पिलीव (तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर ) येथील जाधव यांनी ड्रॅगन फुट्स लागण केल्याचे त्यांना समजले पती ,पत्नी व त्यांचा मुलगा श्रीनिवास यांनी त्या प्लॉटला भेट देऊन त्यांची पाहणी केली आपल्यालाही शेतीमध्ये हे पीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
गावाजवळच पुजारी दांपत्याची शेती आहे. खडकाळ असलेल्या जमिनीत मटकी व तुरीचे पीकही नीट येत नाही अशी एक जमीन त्यांनी निवडली. पन्नास रुपये ला एक याप्रमाणे दोन हजार रुपयांची रोपे खरेदी केली. यासाठी पाचशे सिमेंटचे खांब उभे केले.जुलै महिन्यात या रोपांची लागण केली ठिबक सिंचन पाईप टाकून शेणखत टाकून लागण केली.  ठिबकद्वारे आठवड्यातून एकदा पाणी देण्यास सुरुवात केली. आता आठ महीने झाली असून दीड ते दोन वर्षात ड्रॅगन फुले येण्यास सुरुवात होते.
पहिल्या दीड वर्षातच फळ लागायला सुरुवात होते पहिल्यांदा दीड वर्षात किमान पाच ते सहा टन फळे लागतात. त्यातून वर्षाकाठी आठ ते दहा लाखाचे उत्पन्न निघते या फळाला पुणे मुंबई बेंगलोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्केट आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील अनेक शेतकरी या पिकाकडे वळत आहेत .
ड्रॅगन फुट्स हे सर्व फळांमध्ये अतिशय आरोग्यवर्धक फळ आहे. हाडांच्या मजबुतीसाठी शरीरात कायम फॉस्फरस लागतो यासाठी या फळाचा उपयोग होतो. मधुमेह झालेल्या व्यक्तीने हे फळ खाल्ल्यानंतर साखरेचे प्रमाण नियमित होते. त्यामुळे मोठ मोठ्या शहरात या फळासाठी मोठी मागणी असून या फळामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे ही मिळणार आहेत.
जत तालुक्यात उन्हाळ्याच्या दिवसात पाणी कमी होते. दरवर्षी तालुक्यातील अनेक गावात तलाव कोरडे पडतात व बोअरवेल मधील पाणी संपूर्ण आटते अशावेळी पिके जगवणे ही अवघड होते. यासाठी ड्रॅगन फुड्स हे फळ दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. या दिवसात या पिकाला पाणी कमी लागते एक महिनाभर या पिकाला पाणी दिले नाही तरी चालू शकते त्यामुळे ऐन उन्हाळ्यात अगोदरच पाणी कमी असते त्याचा फायदा आम्हाला उन्हाळ्यात होतो असे गायत्री पुजारी सांगतात.
ड्रॅगन फ्रुट या पिकासाठी सर्वात निकृष्ट दर्जाची शेत जमीन पडीक व माळरान असली तरी या ठिकाणीही पीक जोमाने येते. जत हा दुष्काळी तालुका आहे. तालुक्यातील शेती बहुतांशी पडीक माळरान आहे. या ठिकाणी हे शेतकरी पीक केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल. पुजारी यांच्या या ड्रॅगन  शेतीला अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे. महाराष्ट्र सिंचन सहयोगाच्या वतीने चौदाव्या सिंचन परिषदेत पुरस्कार देऊन या दांपत्याला गौरविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment