Thursday, November 29, 2018

राजाभाऊ सरवदे यांचा सत्कार


जत,(प्रतिनिधी)-
 महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील रिपाइंचे नेते राजाभाऊ सरवदे यांची निवड झाल्याबद्दल जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संजय कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे म्हणाले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यामुळेच हे महामंडळ मिळाले असून या मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मागासवर्गीय युवकांना जास्तीत जास्त कर्जपुरवठा करून त्यांना त्यांच्या पायावर ती आर्थिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना संजय कांबळे म्हणाले की, जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे. येथील नागरिक आपले जीवन जगत आहेत. त्यामुळे मागास वर्गीय लोकांना महात्मा फुले महामंडळाच्यावतीने मदत करावी. या तालुक्यातील मागासवर्गीय तरुण पिढी आर्थिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी केली.

No comments:

Post a Comment