Wednesday, November 14, 2018

जत तालुक्यात पूर्ण विसर्गाने म्हैसाळचे पाणी सोडा

कर्नाटकात वाया जाणाऱ्या पाण्याचे पैसे इंजिनीयरच्या
पगारातून वसूल करा आमदार विलासराव जगताप यांची मागणी
जत,( प्रतिनिधी)-
 जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे गेले वर्षभर पावसाचा पत्ता नाही यासाठी तालुक्यातील अनेक गावच्या शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे यासाठी पैसे भरले आहेत मात्र मिरज तालुक्यातील अनेक जण पैसे न भरता पाणी वापरतात तसेच मिरज तालुक्यातून कर्नाटक हद्दीतील बंधारे पाण्याने भरून पाणी वाया जात असून या वाया जाणाऱ्या पाण्याची चौकशी करून संबंधित इंजिनियरच्या पगारातून पैसे वसूल करून जत तालुक्यात पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी केले.
   जत येथील शासकीय विश्रामधाम येते म्हैसाळ योजनेचे सर्व शासकीय अधिकारी. कंत्राटदार व तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार विलासराव जगताप यांनी ही मागणी केली.
   या बैठकीस शिक्षण सभापती तम्मनगौङा रविपाटील. सभापती सौ सुशीला तांवशी. सौ मंगलताई जमदाङे सौ.श्रीदेवी जावीर. जि. प. सदस्य सरदार पाटील,ॲड. प्रभाकर जाधव,माजी पं.स. सदस्य पवार, अजित पाटील. आप्पासाहेब नामद. लक्ष्मण बोराडे. प्रताप शिंदे. सोमाण्णा हाक्के. विठ्ठल निकम. कायॅकारी  अभियंता विजय पाटील .श्री मिरजकर. अभिमन्यू मासाळ आदी उपस्थित होते..
  जत जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कालव्याच्या कामासंदर्भात व पाणी सोडण्याच्या संदर्भात आमदार विलासराव जगताप यांनी सर्व अधिकारी जत तालुक्यातील पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती यावेळी आमदार जगताप म्हनाले की जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे गेले वर्षभर खरिपाचा हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांना पैशाच्या पाण्याशिवाय पर्यायाने त्यामुळे तालुक्यातील ज्या भागात  गेलेले आहेत त्या भागातील शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना पाणी मिळत नाही कॅनाल्समधून सात मोटारीने पाणी सुरू आहे मात्र यातील बहुतांशी पाणी मिरज. कवठेमंकाळ तालुक्यात सोडले जाते येथील शेतकऱ्यांनी पैसे भरले नाहीत तरीसुद्धा या भागात सर्वाधिक पाणी सोडल्याने जत तालुक्यात केवळ 20 ते 30 टक्के पाणी येत असून शेगाव कासलींगवडी .अंतराळ. बनाळी या परिसरातील शेतकऱ्यांनी पैसे भरून दीड ते दोन महिने झाले तरी यांना पाणी देता येईना तसेच मिरज तालुक्यातून कर्नाटकातील अनेक बंधाऱ्यांना पाणी जात असून हे वाया गेलेल्या पाण्याची चौकशी करून त्याचे संपूर्ण पैसे संबंधी त्यांच्या पगारातून कपात करण्यात यावे अशी मागणी आमदार जगताप यांनी यावेळी केली ते पुढे म्हणाले की जत तालुक्यातील अनेक शेतकरी या पाण्यापासून वंचित आहेत तालुक्यात केवळ आठ इंच पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक तलाव आहेत शेतकऱ्यांची सर्व मदार ही म्हैसाळ पाण्यावर असून जिल्हाधिकारी यांनी याची तातडीने दखल घेऊन पाणी कसे देता येईल यासाठी लक्ष देण्याची मागणी करून मिरज कवठेमंकाळ येथील पाणी बंद करून जत व सांगोला तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांना पाणी देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आमदार जगताप यांनी यावेळी केली.
दरम्यान, जत येथील विश्रामधाम येथे  जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेचे इंजिनिअर व पदाधिकार्‍यांची बैठक असल्याची समजतात तालुक्यातील कोसारी शेगाव बनाळी माडग्याळ अंतराळ या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठक संपल्यानंतर त्यांनी म्हैसाळ चे पाणी सोडा अशी सामूहिक मागणी आमदार जगताप यांच्याकडे केली यावेळी जगताप यांनी म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांना जोपर्यंत या परिसरातील तलाव भरत नाहीत तोपर्यंत सांगोला तालुक्यात पाणी सोडू नका अशा सूचना केल्या. यावर कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी शाळेतून येणारे पाणी हे अपेक्षेपेक्षा कमी क्षमतेने येते त्यामुळे येत्या दोन दिवसात पाण्याचा विसर्ग वाढवून 50 टक्के पाणी जत तालुका व 50 टक्के पाणी सांगोला तालुक्यात सोडण्यात येईल अशी माहिती यावेळी दिली.

    कॅनाल फोडणाऱ्यावर कारवाई करा   
  जत तालुक्यातील म्हैसाळचे पाणी आल्यानंतर काही शेतकरी कॅनल फोडून शेतीला पाणी घेत आहेत अशा तक्रारी शेतकऱ्यांनी या वेळी बैठकीत केल्यानंतर आमदार विलासराव जगताप यांनी संबंधित अभियंत्यांना सूचना दिल्या शेतकरी बेकायदेशीरपणे कॅनाल पडून पाणी घेतात त्यांच्यावर फौजदारी दाखल करा अशा सूचना दिल्या.
माडग्याळ परिसराचा सर्वे पूर्ण
माडग्याळ ता.  जत या परिसरातील गावांना पाणी देण्याचा प्रश्न हा बऱ्यापैकी मार्गी लागला असून या परिसरातील होस्पेट सोरडी गुड्डापुर आधी तलावात पाणी सोडण्याचे मंजुरी मिळाली असून त्याचे अंदाजपत्रक तयार झाले असून तत्त्वतः मान्यता घेतल्यानंतर या कामाला सुरुवात होईल अशी माहिती कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी या बैठकीत दिले

No comments:

Post a Comment