Monday, November 19, 2018

संख येथे जप्त वाळूचा गुरूवारी लिलाव


जत,(प्रतिनिधी)-
 अपर तहसील कार्यालय संखच्या कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृतपणे उत्खनन करून ठेवलेला 22 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. या वाळूसाठ्याचा जाहीर लिलाव 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता अपर तहसील कार्यालय संख इरिगेशन कॉलनी संख येथे करण्यात येणार आहे. यापूर्वीही दोनवेळा संख येथे वाळूचा लिलाव करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment