Monday, November 12, 2018

माडग्याळ येथे अपघातात तरुण ठार

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील माडग्याळ येथून  अर्ध्या किमी अंतरावर  झालेल्या अपघातात संतोष जगन्नाथ  लोहार (वय 25,रा. जाडर बोबलाद) हा युवक जागीच ठार झाला.
जतहुन मोटारसायकलने  ( MH10CK3097) संतोष जगनाथ लोहार हा आपल्या गावी निघाला होता. माडग्याळ जवळ आल्यावर मोटारसायकल ने  पाण्याची टाकी असलेल्या ट्रॅक्टर पाठीमागून जोरदार धडक दिली. यात तरुण डोक्याला जबर मार लागून  जागीच ठार झाला. मोटारसायकलचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे.  व्हसपेठ ते चडचण या राज्य मार्गाचे काम सध्या सुरू असून रस्ता अरुंद  बनला आहे.उमदी पोलिसांनी घटनास्थळी  भेट देऊन पंचनामा केला.अधिक तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment