Wednesday, November 7, 2018

कुडनूर येथे धारधार शस्त्राने वार करून तरुणाचा खून

जत,(प्रतिनिधी)-
कुडनूर (ता. जत) येथील सिद्धनाथ बाबासाहेब सरगर (वय 25) या तरुणाचा अज्ञात व्यक्‍तीने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याबाबत माहिती अशी, सिद्धनाथ हा तरुण ट्रॅक्टरचालक आहे. तो कुडनूर हद्दीतील सरगर वस्तीवर राहतो. बुधवारी लक्ष्मीपूजनाचे साहित्य आणण्यासाठी मोटारसायकलवरून कुडनूरला गेला होता. रात्री परत घरी येताना खांडेकरवस्ती जिल्हा परिषद शाळेजवळ अज्ञात व्यक्‍तीने मोटारसायकल थांबवून त्याच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात धारदार शस्त्राचा वार डोक्यात लागल्याने तो जागीच ठार झाला. हल्ल्यानंतर मारेकरी पसार झाले. मोटारसायकलसह  सिद्धनाथ याचा मृतदेह खांडेकर वस्तीजवळ आढळला. गावकर्‍यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, त्याांनी खुनाच्या घटनेला दुजोरा दिला आहे. दरम्यान, ऐन दिवाळी सणात खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment