Friday, November 23, 2018

जत तालुक्यात तुरीच्या उत्पादनात मोठी घट

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात पाऊस न झाल्याने मोठी दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे तूर उत्पादनात तब्बल नव्वद टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साहजिकच तुरीला यंदा चांगला भाव शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळावी ,अशी मागणी होत आहे.
जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतले जाते. यंदा पाऊस पडेल या आशेवर 5 हजार 32 हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड करण्यात आली आहे. परंतु पाऊसच झाला नसल्याने उगवून आलेली तूर पुरती वाळून गेली आहे. काही ठिकाणी फूलगळही झाली आहे. त्यामुळे तब्बल 90 टक्के तूर उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अलिकडच्या काही वर्षात सांगली जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यांपेक्षा अधिक प्रमाणात तुरीची लागवड घेतली जात आहे. हमखास चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून पाहिले जाते. गेल्यावर्षी सात हजारावर तुरीची लागवड करण्यात आली होती,मात्र यंदा पाऊस झाला नसल्याने पेरणीत तर घट आली आहेच,पण आता दुष्काळी परिस्थिती उदभवल्याने तब्बल 90 टक्के उत्पादनात घट येणार आहे. साधारणत: तूर लागवडीसाठी सात ते आठ हजार खर्च येतो,मात्र यंदा उत्पादनात मोठी घट येणार असल्याने खर्चसुद्धा निघणे कठीण असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

No comments:

Post a Comment