Friday, November 16, 2018

तीर्थ निर्माल्य औषध


 झेंडू : कफयुक्त खोकल्यावर उत्तम. सर्दी पडसे, डोळ्याचा नंबर वाढणे, मोती बिंदू, काच बिंदू वर उपयोगी.
गुलछडी : बद्धकोष्टता, कोलायटीस, कोरडा खोकला, अंगाला सूज, पायाला सूज, किडनी फेल, क्रिएटेनिन वाढणे, ब्लड यूरिया वाढणे इत्यादी वर उपयोगी.
 शेवंती : ॅसिडीटी, पोटातील जळजळ, संडासला खडा होणे, लघवीला आग होणे, कोरडा खोकला, लिव्हरला सूज इत्यादीवर उपयोगी.
बिजली : पाळीला पोटात दुखणे, प्रोस्टेट वाढणे, पित्त वाढणे इत्यादीवर उपयोगी.
जास्वंद : कंपवात, मॅनेंन्जायटीस,लिव्हरला सूज, बद्धकोष्टता, कोलायटीस इत्यादीवर उपयोगी.
पारिजातक : तोंड येणे, सर्दीपडसे, डोळ्याचा नंबर वाढणे, डोळे लाल होणे, पाळीला पोटात दुखणे, मेनोपॉजचा त्रास, अंगावर काळे डाग, इसब,चट्टे गाठी उठणे, संडासला साफ न होणे, इत्यादीवर उपयोगी.
गलांडी : घशासाठी उत्तम. सोनचाफा :पाळी लांबणे, पाळीला गठ्ठे पडणे, गुडघे दुखी, आमवात, हाडाचा क्षय, स्वरयंत्र, थायरॉईड, लघवीली आग होणे इत्यादीवर उपयोगी.
 दुर्वा : गर्भाशय, ओव्हरीज, प्रोस्टेट याच्या उष्णतेवर काम करतात, टाच दुखीवर उपयोगी.
बेल : बेलामुळे शरीरातील हीट कमी होते. हा मूळव्याध, बी पी, मधुमेहासाठी उपयोगी आहे. फुलाचा औषधी उपयोग करण्यासाठी फुल पाण्यात काही तास भिजवून ते पाणी प्यावे लागते. देवावर फुले वाहतो ती दुसर्या दिवशीपर्यंत तशीच असतात. तोपर्यंत त्यातील औषधी अंश काही प्रमाणात देवाचे मूर्तीला चिकटतो व पूजा करताना तो अंश पाण्यात उतरतो आणि ते पाणी तीर्थ म्हणून वापरले जाते. त्यात औषधी गुणधर्म असल्यामुळे पूर्वजांनी त्याला पवित्र ठरवून हे तीर्थ पिण्याची प्रथा पाडली व समाजाचे आरोग्य सहज राखण्याचाप्रयत्न केला. आम्ही आधुनिक शिक्षणामुळे तीर्थ पीत नाही. टाकाऊ, अस्वच्छ ठरवतो. आणि स्वत:चाच तोटा करून घेतो.
 *****
 वडील : बंड्या, नापास झालास तर मला बाबा म्हणू नकोस. निकालादिवशी..
वडील : बंड्या, काय आला निकाल?
बंड्या : नको हो, जाऊ देत. वडील : सांग म्हणतोय ना... बोल पटकन.
बंड्या : गणपत, तुम्हाला बाबा म्हणण्याचा अधिकार मी गमावलाय.
*****
बायको नवर्याला जेवायला वाढते. जेवता-जेवता नवरा अचानक चिडतो.
नवरा : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत तरी तू तांदळातले दोन-चार खडे काढू शकली नाहीस.
 बायको : देवाने तुम्हाला चांगले बत्तीस दात दिले तरी तुम्ही दोन खडे चावू शकला नाहीत. ...
बायको ती बायकोच


No comments:

Post a Comment