Thursday, November 22, 2018

जतचे तत्कालिन तहसीलदार पाटील यांच्यावर गुन्हा


जत,(प्रतिनिधी)-
जतचे तत्कालिन तहसीलदार अभिजीत पाटील यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून दुसर्याच्या शेतजमिनीत जाऊन दंडेलशाहीने महिलेस मारहाण केल्याप्रकरणी जत प्रथमवर्ग न्यायाधीश शिरीषकुमार वाघमारे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत न्यायालयाच्यावतीनेही गुन्हा दाखल केला आहे.याच प्रकरणात दुसरा आरोपी तथा साळमळगेवाडी ग्रामपंचायतीचा सरपंच अण्णासाहेब खांडेकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेमुळे जतच्या महसूल विभागात खळबळ उडाली आहे. साळमळगेवाडी येथील निशा ऊर्फ जनाबाई श्रीकांत मासाळ या गेल्या अनेक वर्षांपासून शेती कसत आहेत. या शेतातून कुठल्याही प्रकारचा रस्ता जात नाही. असे असतानाही तत्कालिन तहसीलदार अभिजीत पाटील यांनी पोलिस बंदोबस्त घेऊन मासाळ यांच्या शेतात जाऊन तीस फूट रस्ता करण्याच्या कामी शेतीचे नुकसान केले, अशी तक्रार निशा मासाळ यांनी दिली. या प्रकरणात तत्कालिन तहसीलदार अभिजीत पाटील यांनी नैसर्गिक न्यायतत्त्वाचा वापर न करता आपल्या पदाचा गैरवापर केला आणि उलट मासाळ कुटुंबियांवरच गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर निशा मासाळ यांनी न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करून न्याय मिळावा, अशी याचिका दाखल केली होती. यानुसार न्यायालयाने अभिजीत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला.

No comments:

Post a Comment