Thursday, November 15, 2018

तानाजी सावंत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार


 जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील सनमडी येथील सिध्दार्थ प्रसारक मंडळ संचलित माडग्याळच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळेतील सहशिक्षक तानाजी सावंत यांना स्वराज शिक्षक संघ यांच्याकडून दिला जाणारा महाराष्ट्र राज्यस्तरीय गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार विक्रम काळे व फत्तेसिग पवार यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी, प्रमुख पाहुणे आमदार विक्रम काळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, विश्वासराव देवकते, रोहित पवार आदी उपस्थित होते. या पुरस्काराचे आयोजन प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंग पवार, देवरे यांनी केले होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष उमाजीराव सनमडीकर; तसेच संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment