Sunday, November 11, 2018

'अँटिबायोटिक'च्या अतिरेकामुळे आजारावर नियंत्रण आणणे झाले अवघड


जत,(प्रतिनिधी)-
लोकांना लवकर रिझल्ट हवा असल्याने अँटिबायोटिक औषधांची मागणी रुग्ण करत असल्याने नाइलाजास्तव डॉक्टरही हीच औषधे लिहून देऊ लागल्याने या औषधाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून आता हीच औषधे आजारावर नियंत्रण ठेवण्यास अक्षम ठरत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.
अँटिबायोटिक (प्रतिजविक )औषधे आजारांवर संजिवनी ठरत असल्याने साहजिक याचा वापर बेसुमार वाढला आहे. खरे तर आजार तीन ते चार दिवस शरीरात राहत असतो.मात्र लोकांना आजार लवकर बरा व्हावा, असे वाटत असल्याने रुग्ण आणि त्यांचे पालक अँटिबाय्प्टिक औषधांची मागणी करीत आहेत. एका आकडेवारीनुसार या औषधाच्या वापराचे प्रमाण आठ पटीने वाढल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र याचा अतिरेक शरीराला घातक असून हे औषध अन्य औषधांची मात्रा चालत नसल्यावर शेवटचा पर्याय म्हणून डॉक्टर मंडळी वापरतात. हे औषध संजिवनी औषध म्हणून ओळखले जाते.मात्र याचा वापर सर्रार्स होऊ लागला आहे. काही डॉक्टर आपल्याकडे रुग्ण खेचण्यासाठी रुग्णांवर या औषधांचा मारा करत आहेत तर काही रुग्णच याची मागणी करत आहेत.परंतु, याच्या सततच्या वापरामुळे पुढील काळात वेगळीच समस्या निर्माण होणार असून त्याचे धोके वेळीच लोकांना समजून सांगण्याची गरज आहे.
अँटिबायोटिक औषधांचा वापर आणि अयोग्य सेवनामुळे साथीच्या आजारात वाढ तर होत आहेच शिवाय त्यावर नियंत्रण मिळवणेही अवघड झाले आहे.काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आणि जागतिक आरोग्य संघटनेने अँटिबायोटिकवर यंदाच्यावर्षी अधिक लक्ष केंदित केल्यानुसार याचा वापर घातक ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या औषधाविषयी व सुयोग्य सेवनाविषयी भारतासारख्या विकसनशील देशात खूपच अज्ञान असल्याचे दिसून येत आहे. स्वत:हून अँटिबायोटिक औषधे सेवन करणे काही डॉक्टरांकडून, औषध विक्रेत्यांकडून अतिवापर होत असल्याने रुग्णांची प्रतिकार क्षमता कमी होत चालली आहे. रुग्ण दगावणे,तसेच रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.दरवर्षी पाच लाख क्षय रोगी वाढत असून यावर नियंत्रण आणण्यात अपयश येत आहे.
आपल्या देशात अँटिबायोटिक औषधांच्या किंमती पन्नास टक्क्याहून अधिक प्रमाणात कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. वास्तविक रुग्णांना या औषधांचा पूर्ण डोस घेता यावा, हे यामागील कारण आहे.परंतु, परिस्थिती मात्र या उलट झाली आहे. बिकट झाली आहे.ाअजही अनेक रुग्णांकडून दहा गोळ्यांचा डोस असला तरी तीन-चार गोळ्याच घेतल्या जात असतात. दोन-चार गोळ्यात बरे वाटू लागयाने रुग्ण पुढे औषध घेत नाहीत. यामुळे डोस पूर्ण न झाल्याने पुढचे धोके आहे. याबाबत जनजागृाती आवश्यक आहे. या औषधांचा वापर आजार बराच होत नसेल तरच करायला हवा, यासाठी थेट लोकांनाच याबाबत मार्गदर्शन होण्याची गरज आहे. 

No comments:

Post a Comment